शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

लष्करी अळीच्या प्रादूर्भावाचे बागलाण तालुक्यात सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:39 IST

सटाणा : येथील तालुका कृषी अधिकारी तसेच वडेल कृषी विज्ञान केंद्राने बागलाण तालुक्यातील मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले असून २ ते ३ टक्केच अळीचा प्रादूर्भाव असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

गुरु वारी (दि.२६) लखमापुर , यशवंतनगर , मुंजवाड , कंधाणे , निकवेल , डांगसौंदाणे , वटार व तरसाळी येथे सर्वेक्षण करण्यात आले. बागलाण तालुक्यात ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झालेली आहे . सध्या मका पीक १५ ते २० दिवसाचे झाले असून वाढीच्या अवस्थेत आहे.गेल्या ५ ते ६ दिवसापासुन मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे . लष्करी अळी सद्या प्रथम व द्वितीय अवस्थेकडे गेल्याचे दिसुन आलेले आहे . याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार ,वडेल कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ विशाल चौधरी, मंडळ कृषी अधिकारी आर. एन. चव्हाण , व्ही . डी. ह्याळिज ,कृषी पर्यवेक्षक सी. बी.देवरे, कृषी सहाय्यक आर. एफ. जाधव , एन. एस. जाधव , बी. एच. थोरात , आर. जी. कांबळे , डी. एस. सोनवणे , एस. एस. नहिरे आदी उपस्थीत होते.अशा करा उपाय योजना....पेरणीनंतर पंधरा दिवसांनी एकरी १० पक्षी थांबे व ५ कामगंध सापळे लावावेत, पिकात पेरणीपासून पहिल्या १० ते १५दिवसात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा १०००० पीपीएम निम आॅईल २ मिली / पंप किंवा १५०० पीपीएम असल्यास ५ मिली / पंप प्रतिबंधात्मक फवारणी करावी, अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास रासायनिक किटकनाशकांची- इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ८ ग्रॅम / पंप किंवा स्पिनोटोरम ११.७ टक्के ईसी ७ मिली / पंप फवारणी करावी, त्यानंतर २५ ते ३० दिवसांनी थायोमिथॉक्झोन १२.६ टक्के + लॅमडा सहलोस्थीन ९.५ टक्के झेड्सी ८ मिलि / पंप फवारणी करावी. त्यानंतर प्रादूर्भाव दिसून आल्यास क्लोरअन्ट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के पंप फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती