शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कहांडळवाडीत १८ कुटूंबांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:42 IST

सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी गावात सोमवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी १८ कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.

ठळक मुद्देरुग्णाने आरोग्य केंद्रात जाऊन स्वत:ची तपासणी करून घेतली

सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी गावात सोमवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी १८ कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.औरंगाबाद येथील एका वाहन उत्पादक कारखान्यात कामाला असणारा सदर रुग्ण दि. २४ जून रोजी गावी परत आला होता. औरंगाबाद येथील कारखान्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊन करीत व्यवस्थापनाने सर्व कामगारांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे गावी परत आल्यावर सदर रुग्णाने आरोग्य केंद्रात जाऊन स्वत:ची तपासणी करून घेतली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला होम क्वारण्टाइन राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार घराजवळ असलेल्या चाळीतील शेड वजा खोलीतच सदर रुग्ण थांबला होता. मात्र, दोन दिवसांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला सिन्नर येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्याच्या थुंकीच्या स्रावांचे नमुने घेतल्यावर पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी सायंकाळी निष्पन्न झाले. गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने कहांडळवाडी येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या पथकाने ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. सदर रुग्ण राहत असलेल्या भागात कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी असणाºया १८ कुटुंबातील ८५ लोकसंख्येचा दैनंदिन सर्वे करण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींना सिन्नर रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून ५ लो रिस्क व्यक्तींना होम क्वारण्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वावी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य व त्यांचे सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. दरम्यान वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कंटेंटमेंट क्षेत्रात नागरिकांना ये- जा करण्यास मनाई असल्याचे सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल