शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती संकलनात घट झाल्याने आश्चर्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:50 IST

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा वादाचा मुद्दा ठरला असून, मनपाच्या दाव्याविषयी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काहीशी शंका व्यक्त केली आहे.

नाशिक : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा वादाचा मुद्दा ठरला असून, मनपाच्या दाव्याविषयी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काहीशी शंका व्यक्त केली आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ आता जोर धरू लागली आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेतून नाशिकमध्ये १९९८ मध्ये विसर्जित मूर्ती आणि निर्माल्य संकलन करण्याची मोहीम सुरू झाली. दुसऱ्या वर्षापासून त्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला आणि आता तर विविध संस्था संघटना मूर्ती संकलनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने ही जनचळवळ झाली आहे. नाशिकमध्ये १ लाख ९५ हजार मूर्ती संकलनाचा यापूर्वी उच्चांक झाला आहे. मात्र दोन ते तीन वर्षांत घट होऊ लागली आहे. यंदाच्या वर्षी १ लाख १६ हजार ८९६ इतक्या मूर्ती संकलित झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत त्यात ५३ हजाराने घट झाली असून, त्यामुळे अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी शंका उपस्थित केली आहे.  नाशिक महापालिकेने मात्र घरोघर शाडूमातीचे गणपती तयार करणे आणि बसविणे या बाबी वाढल्या आहेत.  शिवाय कृत्रिम तलाव किंवा घरीच मूर्ती विसर्जित करण्याचे प्रकार वाढल्याने घट झाल्याचा दावा केला आहे. अलीकडे गणेशोत्सवापूर्वीच शाळा आणि अन्य ठिकाणी शाडूमातीच्या मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा होतात शिवाय नागरिकांत पर्यावरण जागृती वाढली आहे. त्याचा अनुकूल परिणाम दिसून येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. याशिवाय महापालिकेच्या वतीने यंदा ४६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यातही मूर्ती विसर्जित केल्या जातात. शिवाय नागरिक घरगुती विसर्जनदेखील करतात, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाganpatiगणपतीpollutionप्रदूषणenvironmentवातावरणsocial workerसमाजसेवक