सुरगाण्यातील आदिवासी जंतर मंतरवर
By Admin | Updated: September 11, 2016 01:29 IST2016-09-11T01:29:10+5:302016-09-11T01:29:32+5:30
महारॅली : अखिल भारतीय आदिवासी अधिकार मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

सुरगाण्यातील आदिवासी जंतर मंतरवर
सुरगाणा : तालुक्यातील आदिवासी एकता परिषद व आदिवासी बचाव कृती समितीचे शेकडो कार्यकर्ते शनिवारी दिल्लीकडे रवाना झाले असून, १३ सप्टेंबर रोजी जंतर मंतर येथे होणाऱ्या महारॅलीत सहभागी होणार आहेत.
आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी अधिकार मंच द्वारा आयोजित कार्यक्रमाला हे
कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. १३ सप्टेंबर, २००५ या दिवशी
युनो कडून आदिवासींना मुळनिवासींचा दर्जा देऊन त्यांच्या अधिकारा विषयी जाणीव जागृती करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
खासदार हरिश्चंद्र चव्हाण
यांनी दिल्ली येथे जाण्यासाठी लक्झरी बसला हिरवा झेंडा दाखविला.
शेकडो कार्यकर्ते दिल्ली कडे रवाना झाले. महारॅली नंतर प्रधान सचिव यांना धनगर आरक्षण, अँट्रासिटी अँक्ट कायदा रद्द करू नये, आदिवासीचे अधिकारी अबाधित राखावेत आदि मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहेत.
यामध्ये आदिवासी बचाव अभियान कृती समितीचे तालुका अध्यक्ष रतन चौधरी, प्रभाकर
महाले, पांडुरंग पवार, एन. एस. चौधरी, मंगलदास गवळी, केशव महाले, माधव चौधरी, बाळू चौधरी, आदी सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)