सुरगाण्याचा बाजार पुन्हा गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:22 IST2020-11-13T00:21:52+5:302020-11-13T00:22:20+5:30
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये बंद असलेला बाजार ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसह शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सुरगाण्याचा बाजार पुन्हा गजबजला
सुरगाणा : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये बंद असलेला बाजार ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसह शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुरगाणा येथे गत शुक्रवारपासून आठवडे बाजार सुरू करण्यात आला. तालुक्याचे ठिकाण असल्याने पंचक्रोशीतील तसेच शेजारील गुजरात सीमेलगत असलेल्या डांग भागातील नागरिक खरेदीसाठी सुरगाणा येथे येतात. सध्या दिवाळीची धामधूम असल्याने होणाऱ्या गर्दीने बाजारपेठ फुलली असून, नवीन कपडे, किराणा, फटाके इत्यादी गोष्टी खरेदीसाठी बाजारात धामधूम सुरू आहे.