शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुरज निकला मिटा अंधेरा; देखो बच्चो हुआ सवेरा

By admin | Updated: November 16, 2016 22:20 IST

बालदिन : शहरातील विविध शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नवरचना विद्यालयगंगापूररोड : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनिता अहिरे, आशा वायकंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी यांनी केले. नेहरूंच्या जीवनपटाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकट केली. चंद्रकला बोरस्ते व भवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रीती चौधरी, गीता बोगडे आदिंसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.बालशिक्षण मंदिरबालशिक्षण मंदिर, गोरेराम लेन शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून उत्साहात व विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक आशा उमाप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वाती काळे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमप्रसंगी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी नेहरूंच्या वेशभूषेत उपस्थित होते. यानिमित्ताने शाळेत वर्गवार बालगीत व इतर स्पर्धांचे आयोजन करून प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रंजना देवरे, अर्चना वाळके, मनीषा मते, धनेश्वरी आवारे, संगीता वाटपाडे, उज्ज्वला जोंधळे, छाया सोनवणे आदि उपस्थित होते.सार्वजनिक वाचनालयसार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन, साने गुरुजी कथामालेतर्फे बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष नरेश महाजन, कर्नल आनंद देशपांडे, गिरीश नातू, वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद, बालवाचक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.