शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

आयुक्तांच्या समर्थनासाठी ‘मी नाशिककर’ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:17 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी (दि.२२) रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी (दि.२२) रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सर्व पक्षीय सदस्यांनी मांडला होता. त्यावेळीदेखील शहरातील विविध नागरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी वॉक विथ कमिशनर कार्यक्रम राबविला. आता आपण आयुक्तांसाठी वॉक फॉर कमिशनर म्हणून रस्त्यावर उतरू असा संदेश देत नागरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. महापालिका वर्तुळात गेल्या पंधरवड्यापासून मुंढे यांच्या बदलीची चर्चा असली तरी शहरात मात्र सोमवारपासून या चर्चेने जोर धरला. बुधवारी (दि.२२) आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होऊन त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू झाली आणि मुंढे समर्थकांचा बांध फुटला. यासंदर्भात विविध ग्रुपवर मुंढे समर्थकांनी नाराजी व्यक्त करीत आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट करीत लढ्याची दिशा ठरविली. त्यानुसार गुरुवारी (दि.२२) रस्त्यावर उतरण्यात येणार आहे. राज्य शासनाने आयुक्तांची बदली रद्द करावी यासाठी संघटना आणि पक्षभेद विसरून कार्यकर्ते आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुंढे समर्थक नागरी संघटनांनी महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधिकारी भाजपा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त केला असून, भाजपाङ्मला मतदान करू नका हाच मुंढे यांच्या बदलीचा बदला ठरेल, असेदेखील सोशल मीडियावर म्हटले आहे.बदलीच्या पत्राची प्रतीक्षामहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असल्याची चर्चा सकाळपासूनच सुरू असली तरी यासंदर्भात शासनाकडील कोणतेही पत्र आयुक्त मुंढे यांना प्राप्त झालेले नव्हते. बुधवारी (दि. २१) ईदची शासकीय सुटी असल्याने अशाप्रकारचा पत्रव्यवहार होऊ शकत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राधाकृष्ण गमे यांची नाशिकला बदली झाली असली तरी मुंढे यांची कुठेही नियुक्ती झालेली नाही त्यामुळे त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे मुंढे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे