शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

घंटागाडी ठेकेदाराला दत्तक पित्याचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:18 AM

महापालिकेच्या करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या सिडको परिसरातील घंटागाडी ठेकेदार भाजपा पदाधिकाºयांचा निकटवर्तीय असून, त्याला नाशिकच्या दत्तक पित्याचे पाठबळ असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक श्याम साबळे केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांचा विरोध करीत आक्रमक पवित्रा घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीही साबळे यांची पाठराखण केल्यान दोन्ही पक्षांचे नगसेवकांमध्ये उडालेली शाब्दिक चकमक रोखण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी हस्तक्षेप करीत संबंधित वक्तव्य व पक्षीय उल्लेख महासभेच्या कामकाजातून वगळण्यात आदेश दिले.

नाशिक : महापालिकेच्या करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या सिडको परिसरातील घंटागाडी ठेकेदार भाजपा पदाधिकाºयांचा निकटवर्तीय असून, त्याला नाशिकच्या दत्तक पित्याचे पाठबळ असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक श्याम साबळे केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांचा विरोध करीत आक्रमक पवित्रा घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीही साबळे यांची पाठराखण केल्यान दोन्ही पक्षांचे नगसेवकांमध्ये उडालेली शाब्दिक चकमक रोखण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी हस्तक्षेप करीत संबंधित वक्तव्य व पक्षीय उल्लेख महासभेच्या कामकाजातून वगळण्यात आदेश दिले.  महानगरपालिकेच्या महासभेत शुक्रवारी (दि.१८) आरोग्याच्या मुद्द्यावरून घंटागाड्यांची अनियमित्ता आणि ठेकेदाराकडून कामत होत असलेली कुचराई शहारातील स्वाइन फ्लू आणि डेंग्यूसारख्या आजारांना कारणीभूत असल्याचा मतप्रवाह सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला. श्याम साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या बड्या नेत्यांकडे रोख करतानाच त्यांच्या पाठबळामुळे ठेकेदार महापालिका नगरसेवक पदाधिकारी आणि प्रशासनाला जुमानत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपा नगरसेवकांनी सभागृहात उभे राहून संतप्त होऊन साबळे यांना विरोध दर्शवित पक्षीय राजकारण करू नका, असे सुनावले. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनीही साबळे यांच्या बोलण्यात तथ्य असून ठेकेदार क ोणालाही जुमानत नसल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे शाब्दिक चकमक वाढून गोंधळ निर्माण झाल्याने महापौर रंजना भानसी यांनी हस्तक्षेप करून संबंधित वक्तव्य कामकाजातून वगळण्याच्या सूचना केल्या.मनसेचे मास्क आंदोलनशहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू,चिकनगुन्या, अतिसार, कावीळसारख्या आजारांनी थैमान घातले असून, महापालिक ा प्रशासन व सत्ताधारी भाजपाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महापौर अशोक मुर्तडक, गटनेता सलीम शेख योगेश शेवरे यांच्यासह महिला नगरसेवकांनी सभागृहात मास्क लावून सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महासभेत याविषयीच्या लक्षवेधीवर बोलतानाही त्यांनी भाजपा आणि प्रशासनाला लक्ष केले.शिवसेनेची सत्ताधाºयांविरोधात निदर्शनेशिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘सत्ताधारी मदमस्त, नाशिककर डेंग्यूने त्रस्त’ अशी घोषवाक्य मुद्रित केलेल्या टोप्या घालून महासभेच्या कामकाजात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे सभागृहात शिवसेनेतर्फे आरोग्याच्या विषयावर लक्षवेधी मांडतानाच भाजपाचे पदाधिकारी आणि प्रशासनाला टीकेचे लक्ष करतानात महासभेऐवजी महाआंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे