नाशिक : महापालिकेच्या करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या सिडको परिसरातील घंटागाडी ठेकेदार भाजपा पदाधिकाºयांचा निकटवर्तीय असून, त्याला नाशिकच्या दत्तक पित्याचे पाठबळ असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक श्याम साबळे केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांचा विरोध करीत आक्रमक पवित्रा घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीही साबळे यांची पाठराखण केल्यान दोन्ही पक्षांचे नगसेवकांमध्ये उडालेली शाब्दिक चकमक रोखण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी हस्तक्षेप करीत संबंधित वक्तव्य व पक्षीय उल्लेख महासभेच्या कामकाजातून वगळण्यात आदेश दिले. महानगरपालिकेच्या महासभेत शुक्रवारी (दि.१८) आरोग्याच्या मुद्द्यावरून घंटागाड्यांची अनियमित्ता आणि ठेकेदाराकडून कामत होत असलेली कुचराई शहारातील स्वाइन फ्लू आणि डेंग्यूसारख्या आजारांना कारणीभूत असल्याचा मतप्रवाह सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला. श्याम साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या बड्या नेत्यांकडे रोख करतानाच त्यांच्या पाठबळामुळे ठेकेदार महापालिका नगरसेवक पदाधिकारी आणि प्रशासनाला जुमानत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपा नगरसेवकांनी सभागृहात उभे राहून संतप्त होऊन साबळे यांना विरोध दर्शवित पक्षीय राजकारण करू नका, असे सुनावले. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनीही साबळे यांच्या बोलण्यात तथ्य असून ठेकेदार क ोणालाही जुमानत नसल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे शाब्दिक चकमक वाढून गोंधळ निर्माण झाल्याने महापौर रंजना भानसी यांनी हस्तक्षेप करून संबंधित वक्तव्य कामकाजातून वगळण्याच्या सूचना केल्या.मनसेचे मास्क आंदोलनशहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू,चिकनगुन्या, अतिसार, कावीळसारख्या आजारांनी थैमान घातले असून, महापालिक ा प्रशासन व सत्ताधारी भाजपाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महापौर अशोक मुर्तडक, गटनेता सलीम शेख योगेश शेवरे यांच्यासह महिला नगरसेवकांनी सभागृहात मास्क लावून सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महासभेत याविषयीच्या लक्षवेधीवर बोलतानाही त्यांनी भाजपा आणि प्रशासनाला लक्ष केले.शिवसेनेची सत्ताधाºयांविरोधात निदर्शनेशिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘सत्ताधारी मदमस्त, नाशिककर डेंग्यूने त्रस्त’ अशी घोषवाक्य मुद्रित केलेल्या टोप्या घालून महासभेच्या कामकाजात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे सभागृहात शिवसेनेतर्फे आरोग्याच्या विषयावर लक्षवेधी मांडतानाच भाजपाचे पदाधिकारी आणि प्रशासनाला टीकेचे लक्ष करतानात महासभेऐवजी महाआंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
घंटागाडी ठेकेदाराला दत्तक पित्याचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:18 IST