देवपूरच्या सरपंचपदी सुनीता गडाख बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:19 IST2019-12-15T23:18:57+5:302019-12-15T23:19:20+5:30
देवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता नवनाथ गडाख यांची बिनविरोध निवड झाली.

देवपूरच्या सरपंचपदी सुनीता गडाख बिनविरोध
सिन्नर : देवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता नवनाथ गडाख यांची बिनविरोध निवड झाली.
सरपंच योगीता विकास गडाख यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त होते. सरपंच निवडीसाठी शुक्रवारी (दि. १३) मंडल अधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. मात्र गणपूर्ती न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी (दि. १४) पुन्हा विशेष बैठक झाली. त्यात सारपंचपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सुनीता गडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी शरद श्रीहरी गडाख, चंद्रभान गडाख सुमन गडाख, संतोष जाधव, विमल रानडे, सुनीता कळंबे योगिता गडाख या ग्रामपंचायत सदस्यांसह नवनाथ गडाख, जुगल गवळी, प्रल्हाद गडाख विकास धरम यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी पवार यांना तलाठी सोनवणे यांनी निवडणुकीत सहकार्य केले.