डुबेरेच्या उपसरपंचपदी सुनील वारुंगसे

By Admin | Updated: August 8, 2014 00:51 IST2014-08-07T22:05:32+5:302014-08-08T00:51:53+5:30

डुबेरेच्या उपसरपंचपदी सुनील वारुंगसे

Sunil Varangse as Dubere's Deputy Chief | डुबेरेच्या उपसरपंचपदी सुनील वारुंगसे

डुबेरेच्या उपसरपंचपदी सुनील वारुंगसे


सिन्नर : तालुक्यातील डुबेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सुनील वारुंगसे यांनी नऊ पैकी सहा मते मिळवून विजय संपादन केला, तर ज्ञानेश्वर कुंदे यांना पराभव पत्कारावा लागला.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अंजना वाजे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपसरपंच खंडेराव बर्वे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर तांबे, अशोक वाजे, सुनील वारुंगसे यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले. कुंदे व वारुंगसे यांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात कुंदे यांना एक मत मिळाले, तर वारुंगसे यांना सहा मते मिळाली.


अन्य दोन सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी सरपंच रामनाथ पावसे, नारायण वाजे, अंजना वाजे, रामेश्वर माळी, ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर कुंदे, मोहन माळी, मंगल साळवे, प्रतिभा वाजे, सुनील वारुंगसे बैठकीत उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी जे. जी. वाडगे यांनी निवडणुकीची सदस्यांना माहिती दिली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत वारुंगसे यांचा विजय झाल्यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सिन्नर पोलिसांच्या वतीने निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस हवालदार एम. बी. खतेले, एन. आर. डावखर, आर. के. भागवत यांनी चोख बंदोबस्त दिला. (वार्ताहर)

Web Title: Sunil Varangse as Dubere's Deputy Chief