सुंदरनारायण मंदिरावर नववर्षात चढणार कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:33 IST2018-12-17T00:33:13+5:302018-12-17T00:33:25+5:30
पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या २६२ वर्षे जुन्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. वास्तूची आतील बाजू जैसे-थे ठेवत केवळ बाह्य बाजूने दगडी बांधकामाचे नूतनीकरण करण्याची पुरातत्व विभागाची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.

सुंदरनारायण मंदिरावर नववर्षात चढणार कळस
नाशिक : पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या २६२ वर्षे जुन्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. वास्तूची आतील बाजू जैसे-थे ठेवत केवळ बाह्य बाजूने दगडी बांधकामाचे नूतनीकरण करण्याची पुरातत्व विभागाची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. अशा पद्धतीने बांधकाम करण्यात येणारा राज्यातील हा एकमेव प्रकल्प असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यात गर्भगृहाच्या बाह्य बाजूच्या नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम २०१९ अखेर पूर्णत्वास येणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे.
गोदाकाठावर अनेक लहान-मोठी पुरातन मंदिरे आजही बघावयास मिळतात. त्यापैकी एक सुंदरनारायण. सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. मंदिराची पडझड रोखण्यसाठी सुंदरनारायण मंदिराच्या संरक्षित वास्तूचे नूतनीकरणाचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.
यासाठी शासनाने सुमारे
१२.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या गर्भगृहाचे जुने दगड उतरविण्यात आले आहे. गर्भगृह, शिखर दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम २०१९अखेर पूर्ण केले जाणार आहे.
पेशवेकालीन अद्भुत मंदिर
पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या मंदिरांपैकी एक सुंदरनारायण मंदिर आहे. यादवकाळातील मंदिरांच्या तुलनेत या मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड कमकुवत असल्याने पडझड अधिक झाली. नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक दगडांचा वापर यासाठी त्यावेळी केला गेला. पेशवेकालीन मंदिर बांधकाम शैलीचा अद्भुत कलाविष्कार या वास्तूच्या रुपाने शहरात पहावयास मिळतो. मंदिराची संपूर्ण शास्त्रीय रचना पूर्ण करणारी ही वास्तू आहे. शिखर, गर्भगृह तसेच मंडप, मुख मंडप, तीन प्रवेशद्वार या मंदिराला आहे. पेशवेकालीन मंदिर बांधकाम शैलीचा हा सुंदर नमुना असल्यामुळे पुरातत्व खात्याने त्यास संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे.
दुसºया टप्प्यातील मंदिराचे उर्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. मंदिराच्या वास्तूचे जे दगड १०० टक्क्यांपेक्षा अधिक निकामी झाले आहेत ते संपूर्णत: बदलण्यात येणार आहेत, तर जे दगड काही प्रमाणात सुस्थितीत आहेत, त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्याअगोदर संपूर्ण वास्तूचे चित्रीकरण करण्यात आले होते.