सांगवीच्या सरपंचपदी सुनंदा चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:57 IST2021-02-18T22:10:31+5:302021-02-19T01:57:13+5:30
उमराणे : देवळा तालुक्यातील सांगवीच्या सरपंचपदी सुनंदा संजय चव्हाण व उपसरपंचपदी दीपक प्रताप ठोके यांची बिनविरोध निवड झाली.

सांगवीच्या सरपंचपदी सुनंदा चव्हाण
उमराणे : देवळा तालुक्यातील सांगवीच्या सरपंचपदी सुनंदा संजय चव्हाण व उपसरपंचपदी दीपक प्रताप ठोके यांची बिनविरोध निवड झाली.
नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत युवा नेते रवींद्र अहिरे, मुरलीधर अहिरे, भाऊसाहेब चव्हाण यांच्या पॅनलने पाच जागा जिंकून माजी सरपंच मिलिंद शेवाळे यांच्या गटाकडून पंधरा वर्षांची सत्ता खेचून आणली आहे. तीन पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली होती. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली.
सरपंचपदासाठी सुनंदा चव्हाण आणि उपसरपंच पदासाठी दीपक ठोके यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वैशाली अहिरे, इंदुबाई अहिरे, बाळासाहेब दळवी, रंगनाथ बस्ते, नबाबाई दळवी, मिलिंद शेवाळे, अनुसया जाधव यांच्यासह पॅनलचे नेते रवींद्र अहिरे, मुरलीधर अहिरे, भाऊसाहेब चव्हाण, बाळू ठोके, अनिल अहिरे, पोपट अहिरे, मोठाभाऊ चव्हाण, त्र्यंबक चव्हाण, रामकृष्ण व्हलगडे उपस्थित होते.