शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढले उन्हाचे चटकेअसह्य

By admin | Updated: March 26, 2015 00:15 IST

उकाडा : कमाल आणि किमान तपमानात झाली वाढ

नाशिक : मार्च महिना संपत आला असतानाच वैशाख वणव्याची चाहूल लागली असून, गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. मार्चमध्येच कमाल तपमानाचा पारा ३८.३ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला असून, त्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू झाली आहे, तर दुसरीकडे किमान तपमानातही मोठी वाढ होते आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामानाने मुक्काम ठोकला होता. दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस व गारपिटीनेही तडाखा दिला. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. सकाळी थंडी, दुपारी ऊन व रात्री पाऊस अशी परिस्थितीही नाशिककरांनी काही दिवस अनुभवली. आठवडाभरापासून मात्र हे वातावरण निवळले असून, सकाळी दहा वाजेपासूनच कडक ऊन जाणवत आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत शहराच्या तपमानात सुमारे तीन अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी (दि. २०) शहराचे कमाल तपमान ३५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. त्यात रविवारी दोन अंशांनी भर पडून ते ३८ अंशांवर पोहोचले. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे नागरिक डोक्यावर टोपी, उपरणे, तर महिला सनकोट परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. शहरातील रसवंतीगृहे सुरू झाली असून, शीतपेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे. सायंकाळी आइस्क्रीम पार्लरवरील गर्दीही वाढली आहे. रस्त्यांवर शुकशुकाटउन्हाचे चटके बसू लागल्याने दुपारनंतर रस्त्यांवरील रहदारीवर परिणाम होऊ लागला आहे. सध्या सुरू असलेले परीक्षेचे दिवस आणि क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर यातच उन्हाचा चटका यामुळे दुपारी १ नंतर शहरातील दुय्यम रस्त्यांवर संपूर्ण शुकशुकाट जाणवत आहे. एवढेच नव्हे तर रिक्षा, बसेसमध्येही तुलनेने कमी गर्दी दिसून येत आहे. बुधवारच्या बाजारावरही उन्हाचा परिणाम दिसून आला. बाजारात विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. त्याचप्रमाणे दुपारी बाजारात पूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता. यामुळे उलाढालही घटली. (प्रतिनिधी)