उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:07 IST2018-12-07T19:07:04+5:302018-12-07T19:07:19+5:30
मागील वर्षाप्रमाणे उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेवर तब्बल नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी घसरली असून, चालूवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यानंतरही लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. परिणामी उन्हाळी व लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण
उमराणे : मागील वर्षाप्रमाणे उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेवर तब्बल नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी घसरली असून, चालूवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यानंतरही लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. परिणामी उन्हाळी व लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
चालूवर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने लाल कांद्याचे उत्पादन घटेल व उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेपोटी गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी कमालीची घसरली असून, कांदा सडण्यासह वातावरणात बदल घडल्याने कोमटे फुटून कांदा वाळल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय बाजारात या कांद्याला ग्राहक नसल्याने अवघ्या तीनशे ते चारशे रु पये सरासरी दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने उत्पादनापासून मिळणारा नफा तर दूरच; परंतु त्यासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने उन्हाळी कांदा साठवणूकदार शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. यावास्तव चालूवर्षी पाऊस नसल्याने लाल कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल कांदा उत्पादन घटले असा अंदाज असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बहुतांश शेतकºयांनी लाल कांद्याचे उत्पादन यशस्वी केले; परंतु या कांद्याच्या आवकेत घट न होता वाढतच राहिल्याने लाल कांद्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे. उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याचे दर कमीत कमी १०० रु पये, जास्तीत जास्त ६११ रु पये तर सरासरी ४०० रु पये आहेत. तसेच लाल कांद्याचे दर कमीतकमी ४०१ रु पये, जास्तीत जास्त १२५० रु पये, तर सरासरी ७०० रु पये आहेत.