उन्हाळ कांदा १४ हजार पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:28 IST2019-12-03T14:28:04+5:302019-12-03T14:28:28+5:30
कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याने १४ हजार रूपयांचा टप्पा ओलांडला असून मंगळवारी १४,१०० रूपये जाहीर झाला.

उन्हाळ कांदा १४ हजार पार !
कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याने १४ हजार रूपयांचा टप्पा ओलांडला असून मंगळवारी १४,१०० रूपये जाहीर झाला. मंगळवारी कमीत कमी ६ हजार, जास्तीत जास्त १४,१०० तर सरासरी १२५०० ते १३५०० रूपये भाव जाहीर करण्यात आला. ७४ ट्रॅक्टर आणि १६ पिकअप जीपमधून ९० वाहनांचा लिलाव करण्यात आला.मागील आठवड्यात लाल कांद्याची आवक वाढल्याने उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची दहा हजारांच्या अपेक्षेने लावून धरलेल्या कांद्यांचे दर पुन्हा कमी होतील की काय या भीतीपोटी मागील आठवड्यातच पाच ते सहा हजाराच्या दराने मोठ्या प्रमाणात विक्र ी केली होती. परंतु पुन्हा लाल कांद्याची आवक घटल्याने व मागणी वाढल्याने दहा हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा दराने तब्बल १४ हजारांचा टप्पा गाठत दराचा उच्चांक गाठला आहे.