येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 09:52 PM2020-11-21T21:52:40+5:302020-11-22T01:42:48+5:30

येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी चांगली होती.

Summer onion arrivals in Yeola survive | येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून

येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून

Next
ठळक मुद्दे बाजारभाव स्थिर : राज्यात मागणीत वाढ

येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक १४,९२१ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. १८०० ते कमाल रु. ४९०१ तर सरासरी रु. ३८०० प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक २९८३ क्विंटल झाली असून, कांद्याचे बाजारभाव किमान रु. १२०० ते कमाल रु. ४६५०, तर सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारीवर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक १८७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १३०० ते कमाल रु. १९२२, तर सरासरी रु. १५८० पर्यंत होते. सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीस स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ५७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ११०० ते कमाल रु. १२७५, तर सरासरी १२०० रुपयांपर्यंत होते. हरभर्‍याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरभऱ्यास व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात एकूण आवक १२ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ३५०० ते कमाल रु. ४८०० तर सरासरी रु. ४५९० पर्यंत होते.

Web Title: Summer onion arrivals in Yeola survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.