बोराळे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या

By Admin | Updated: December 23, 2014 00:15 IST2014-12-22T23:57:24+5:302014-12-23T00:15:31+5:30

बोराळे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या

Suicides of a young farmer at Borale | बोराळे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या

बोराळे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या


चांदवड/वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील बोराळे येथील ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेती कर्जाला कंटाळून स्वत:च्या विहिरीत आत्महत्त्या केली. बोराळे येथील किरण दत्तात्रय पवार ( ३७) सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले. ते आठ वाजेपर्यंत परत आले नाही म्हणून घरातील लोकांनी शोध घेतला असता विहिरीच्या बाहेरच किरण यांचे स्वेटर व चपला पडल्या असल्याचे लक्षात आले. विहिरीत बघताच बोराळे येथील नागरिकांनी किरण यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. पवार यांनी सन २००६ मध्ये द्राक्षबाग आणि शेतीसाठी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. सुमारे दहा ते बारा लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. पवार यांच्या पश्चात
पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. ( वार्ताहर)

Web Title: Suicides of a young farmer at Borale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.