पंचवटीत महिलेची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:26 IST2017-08-02T16:25:35+5:302017-08-02T16:26:19+5:30

पंचवटीत महिलेची आत्महत्त्या
नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील दुर्गानगर परिसरात राहणाºया पूनम पवन पाटील (३५) या महिलेने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना लक्षात आल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत पूनम पाटील यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस हवालदार माळोदे क रीत आहेत.