जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:52 IST2018-01-19T00:51:19+5:302018-01-19T00:52:26+5:30

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे.

Suicides of two farmers in two days in the district | जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या

जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे.
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील नारायण संदीप शेवाळे या शेतकºयाने बुधवारी (दि. १७) रामराव स्टेडिअम (कोराड) येथे जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावावर गट नं. २०९/२ मध्ये ८२ आर जमीन आहे. देवळा तहसीलदारांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. दुसºया घटनेत गुरुवारी (दि. १८) बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे अशोक दगा काकुळते (वय ५३) या शेतकºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील औरंगापुरा येथे शेतकºयाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आणखी दोन शेतकºयांनी आत्महत्या केली असल्याने नव्या वर्षात आत्तापर्यंत एकूण तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Suicides of two farmers in two days in the district

टॅग्स :Nashikनाशिक