मालेगावच्या तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:28 IST2019-01-01T23:27:38+5:302019-01-01T23:28:17+5:30
नाशिक : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ ३१) सायंकाळच्या सुमारास सिडको परिसरात घडली़ ललित भास्कर सोनवणे (२२, रा़ आघार बु., ता़ मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़

मालेगावच्या तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
ठळक मुद्देफेट्याच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास
नाशिक : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ ३१) सायंकाळच्या सुमारास सिडको परिसरात घडली़ ललित भास्कर सोनवणे (२२, रा़ आघार बु., ता़ मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ आघार बु. येथील ललित सोनवणे याने आयटीआयचे शिक्षण घेतलेले होते़ नोकरीच्या शोधासाठी तो सिडकोत आला होता़ शिवशक्ती चौकात राहणाऱ्या मित्रांच्या रूमवर तो राहात होता़ नोकरी मिळत नसल्याने नैराश्यात असलेल्या ललितने सोमवारी दरवाजाला आतून कडी लावून फेट्याच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली़