अंदरसूल येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:54 IST2020-05-30T23:01:44+5:302020-05-30T23:54:08+5:30
लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून येथील एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल गणपत जाधव असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे गावात मोबाइल शॉपीचे दुकान आहे.

अंदरसूल येथे तरुणाची आत्महत्या
अंदरसूल : लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून येथील एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल गणपत जाधव असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे गावात मोबाइल शॉपीचे दुकान आहे.
लग्नासाठी बरीच स्थळे बघितली. मात्र, लग्न जमत नसल्याने नैराश्यातून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास येवला सहायक पोलीस निरीक्षक तांदाळकर, हवलादार हेंबाडे करत आहेत.