Suicide of a young girl | अल्पवयीन तरु णीची आत्महत्या

अल्पवयीन तरु णीची आत्महत्या

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे करीत आहे.

मालेगाव मध्य : महामार्गावरील माळधे शिवारातील लब्बैक हॉटेल मागील वस्तीत शनिवारी (दि.२६) अल्पवयीन तरु णीने राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयताचा भाऊ हसन महेबुब शेख याने या घटनेची माहिती दिली असुन पवारवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आशिया महेबुब शेख (१७) असे तरुणीचे नाव आहे. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घराच्या बाजुलाच राहणारी मोठी बहीण व आई बाजारात गेले असता आशियाने घरातल्या छताला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आई व भावास माहिती दिली. मयताच्या वडीलाचे निधन झाले असुन दोन भाऊ भिवंडीत यंत्रमाग कामगार आहेत. तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असुन त्यांच्या जवळ दफनविधीसाठीही रक्कम नव्हती. याची कल्पना समाजसेवक मोंहम्मद शिफक (अ‍ॅन्टीकरप्शन) यांनी सामाजिक बांधिलकी जपत रोख स्वरूपात मदत केली. तिच्या पश्चात आई, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे करीत आहे.

Web Title: Suicide of a young girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.