घोटीजवळ तरुण, तरुणीची रेल्वेखाली आत्महत्त्या

By Admin | Updated: March 6, 2017 00:46 IST2017-03-06T00:45:02+5:302017-03-06T00:46:03+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील एका प्रेमीयुगुलाने आज पहाटे धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून आत्महत्त्या केल्याची घटना घडली.

Suicide under the train of a young woman, near the ghoti | घोटीजवळ तरुण, तरुणीची रेल्वेखाली आत्महत्त्या

घोटीजवळ तरुण, तरुणीची रेल्वेखाली आत्महत्त्या

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील एका प्रेमीयुगुलाने आज पहाटे धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून आत्महत्त्या केल्याची घटना घडली. याबाबत इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील गिऱ्हेवाडी येथील राजेश नामदेव गांगड (२०) व पूजा गणपत गिऱ्हे (१७) या दोघांनी काल मध्यरात्री घरातून पळ काढला. घोटीजवळील रेल्वे लाइनजवळ आल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी
दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती सकाळी पादचाऱ्यांना समजताच त्यांनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, चालक प्रधान, हवालदार रामदास गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आत्महत्त्येचे कारण समजू शकलेले नाही.(वार्ताहर)

Web Title: Suicide under the train of a young woman, near the ghoti