माळेगावला बारावर्षीय मुलीची गळ फास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 19:05 IST2018-08-05T19:04:20+5:302018-08-05T19:05:48+5:30

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जान्हवी रवींद्र निखारे (१२) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या माळेगाव शाळेत शिक्षण घेत होती.

Suicide by taking a twelve-year-old girl's groin in Malegaon | माळेगावला बारावर्षीय मुलीची गळ फास घेवून आत्महत्या

माळेगावला बारावर्षीय मुलीची गळ फास घेवून आत्महत्या

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जान्हवी रवींद्र निखारे (१२) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या माळेगाव शाळेत शिक्षण घेत होती.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार मुळचे चंद्रपूर येथील रहिवाशी असलेले रवींद्र निखारे हे आदर्शनगर, माळेगाव येथे वास्तव्यात असून क्युपीड रबर कारखान्यात दोघेही पती-पत्नी कामाला आहेत. रविवारी सकाळी दोघे पती-पत्नी कामावर गेले होते. तर जान्हवी आणि वैभव (९) हे दोघे घरी होते. वैभव मित्रांसोबत खेळायला बाहेर गेल्यानंतर घरात एकटी असलेल्या जान्हवीने भिंतीला असणाºया हँगरला ओढणी अडकवून गळफास घेत आत्महत्या केली. ११ वाजेच्या सुमारास वैभव घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सदरची घटना उघडकीस आली. आसपास राहणाºया रहिवाशांनी निखारे दाम्पत्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून जान्हवीचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण बदादे, राम हरळे अधिक तपास करत आहे.
 
Web Title: Suicide by taking a twelve-year-old girl's groin in Malegaon

टॅग्स :Crimeगुन्हा