विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:03 IST2017-07-25T16:03:10+5:302017-07-25T16:03:10+5:30
राहत्या घरी गळफास ; गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कॉलेजरोडवरील डिसुझा कॉलनीतील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास घडली़ अनिता अनिल हुल्लाळे असे आत्महत्त्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका अपार्टमेंटमधील अनिला हुल्लाळे यांनी दुपारी दोनच्या धरातील पंख्याच्या हुकास सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ दरम्यान, आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़