अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:02 IST2020-06-15T21:29:02+5:302020-06-16T00:02:51+5:30
चांदवड : येथील गुरुकुल कॉलनीतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीने स्वयंपाकघरातील स्टोअररूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. श्रेया शिवराज धुमाळ असे या मुलीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
चांदवड : येथील गुरुकुल कॉलनीतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीने स्वयंपाकघरातील स्टोअररूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. श्रेया शिवराज धुमाळ असे या मुलीचे नाव आहे.
गुरुकुल कॉलनीत एन.पी. गांगुर्डे यांच्या घरात भाडेतत्त्वावर शिवराज धुमाळ राहतात. त्यांची मुलगी श्रेया इयत्ता नववीत शिकत होती. वडिलांची नुकतीच चांदवड येथून एका कंपनीत चंद्रपूर येथे बदली झाली होती. आई ब्यूटिपार्लर चालविते. आई व मोठी बहीण सोमवारी (दि. १५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाजारात गेल्या असता श्रेयाने स्टोअररूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीचे कर्मचारी म्हस्के यांनी पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपनिरीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरिचंद्र पालवी, पोलीस कर्मचारी विजय जाधव घटनास्थळी दाखल झाले. श्रेयाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला. श्रेयाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
याप्रकरणी चांदवड पोलिसात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, श्रेयाने अचानक असे कृत्य केल्याने कुटुंबियांसह परिसरातील रहिवाशांना धक्का बसला आहे. तर गुरुकुल कॉलनीत शोककळा पसरली आहे.