शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By श्याम बागुल | Updated: November 2, 2018 15:52 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे.

ठळक मुद्देबागलाण, दिंडोरी खालोखाल : आॅक्टोंबरमध्ये उच्चांक

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक असून गेल्या दहा महिन्यात ८५ शेतक-यांनी विविध माध्यमांचा वापर करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात करण्यात आल्या असून, त्या खालोखाल बागलाण व दिंडोरी या दोन तालुक्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्रात आॅगष्ट व आॅक्टोंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतक-यांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १३ व १२ शेतक-यांनी चालू वर्षी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी निफाडमध्ये दिंडोरीपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. निफाडमध्ये १३ तर दिंडोरीत ११ शेतक-यांनी जीवन संपविले होते. यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमीच टंचाईचा सामना करणा-या बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी व यंदाही १३ शेतक-यांनी आत्तापर्यंत आत्महत्येचा मार्ग धरला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना गेल्या वर्षी आॅक्टोंबर अखेर ९५ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. यंदा हे प्रमाण १० ने घटले असले तरी, यंदा पावसाने फिरविलेली पाठ, खरीप व रब्बीचे झालेले नुकसान, भीषण पाणी टंचाई, जनावरांच्या चा-या, पाण्याचा प्रश्न पाहता शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता शेतीतील जाणकार व्यक्त करीत आहेत.चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, दरमहिन्याला साधारणत: सात ते आठ शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत. आॅक्टोंबर अखेर ८५ शेतक-यांनी आत्महत्या केली असून, त्यातील शासकीय मदतीसाठी १७ शेतकरी पात्र ठरले तर ३० शेतक-यांच्या आत्महत्येचे कारणे वेगळी असल्याने त्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. ३८ शेतक-यांबाबत निर्णय प्रलंबीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक