विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:51 IST2020-12-23T22:54:45+5:302020-12-24T00:51:24+5:30
सिन्नर: तालुक्यातील वावीजवळ असलेल्या पिंपरवाडी(यशवंतनागर) येथे विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी घडला.

विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
सिन्नर: तालुक्यातील वावीजवळ असलेल्या पिंपरवाडी(यशवंतनागर) येथे विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी घडला.
पिंपरवाडी येथील मनीषा अनिल गायकवाड (२५), तिची चार वर्षाची मुलगी ओवी चार महिन्याची चिमुकली अन्वी अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गावालगत असलेल्या बाबासाहेब हाडोळे यांच्या शेतातील विहिरीत सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. हा प्रकार येथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलीस ठाण्यास खबर दिली. यावरून वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश गवळी, नितीन जगताप, दशरथ मोरे, सतीश बैरागी ,प्रकाश उंबरकर, प्रकाश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.