Suicide of a married couple in Mahiravani | महिरावणी येथील विवाहितचीे आत्महत्या
महिरावणी येथील विवाहितचीे आत्महत्या

ठळक मुद्दे या विवाहितेचे चार वर्षापुर्वी लग्न झालेले होते

त्र्यंबकेश्वर : महिरावणी येथे राहणाऱ्या मयुरी गणेश खांडबहाले (२२) या विवाहितेने रविवारी (दि.१३) दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरी बाथरु मच्या खिडकीतील गजाला ओढणी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर तरु णीचा मृतदेह त्वरीत नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आला. त्यापुर्वीच ही विवाहिता मयत झालेली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. या विवाहितेचे चार वर्षापुर्वी लग्न झालेले होते. तिला दोन वर्षाचा मुलगा आहे.


Web Title: Suicide of a married couple in Mahiravani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.