फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:56 AM2021-01-10T00:56:51+5:302021-01-10T00:57:53+5:30

वणी : नाशिकच्या इंदिरानगर येथील फायनान्स कंपनीतील प्रमुख व्यवस्थापकाने कृष्णगाव येथे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. सुसाईड नोटमधे कंपनीतील तीन प्रतिनिधींचा उल्लेख असल्याने त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suicide of a manager of a finance company | फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

Next

वणी : नाशिकच्या इंदिरानगर येथील फायनान्स कंपनीतील प्रमुख व्यवस्थापकाने कृष्णगाव येथे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. सुसाईड नोटमधे कंपनीतील तीन प्रतिनिधींचा उल्लेख असल्याने त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी-कृष्णगाव रस्त्यावर शनिवारी (दि.९) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याठिकाणी विषारी औषधाची रिकामी बाटली आढळून आली. सदर इसमाची माहिती संकलीत केली असता नितेश दिनेश चन्द्रात्रे (रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) येथील असुन ते सनुश्री लिमीटेड कंपनीत स्टेट हेड व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. डिपाॕजीट अगेन्स्ट लोन अशी कार्यप्रणाली या कंपनीची असल्याची माहीती पुढे आली. तिघा संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनामीमुळे कृत्य?
चौकशी अंती चन्द्रात्रे यांची सुसाईड नोट पोलीसांना मिळाली. त्यात गौरव करकरे , जय थोरात व गौरव वाणी या तीन प्रतिनिधींनी कागदपत्र गहाळ करुन चन्द्रात्रे यांनी २० लाख रुपये काढून घेतले असा आरोप केला होता. याचा मनस्ताप चन्द्रात्रे यांना झाला व बदनामी सहन न झाल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली, अशी प्राथमिक माहिती समोर आली.

Web Title: Suicide of a manager of a finance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.