नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:31 IST2020-12-26T22:57:36+5:302020-12-27T00:31:35+5:30
नाशिक : देवळा तालुक्यातील निवानेबारी घाटात झाडाला गळफास घेऊन येथील विजय रामदास आहेर (४१) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.

विजय आहेर
ठळक मुद्देआत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही
नाशिक : देवळा तालुक्यातील निवानेबारी घाटात झाडाला गळफास घेऊन येथील विजय रामदास आहेर (४१) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.
सदर घटना शुक्रवारी (दि. २५) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास देवळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, एक भाऊ, असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी रामदास त्र्यंबक आहेर यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत.