शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर निर्मितीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:01 AM

नाशिक: जिल्'ात आॅक्सिजन पुरेसा आहे; प्रत्येक रूग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्यात यावे. जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती सेन्टर सुरू करण्यात यावे, तसेच आॅक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीच आॅक्सिजन वाहतुक व पुरवठ्यासाठी दोन टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देभुजबळ यांच्याकडून आढावा: वाहतुकीसाठी दोन टँकर

नाशिक: जिल्'ात आॅक्सिजन पुरेसा आहे; प्रत्येक रूग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्यात यावे. जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती सेन्टर सुरू करण्यात यावे, तसेच आॅक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीच आॅक्सिजन वाहतुक व पुरवठ्यासाठी दोन टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्'ातील कोरोना उपचारासंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, आॅक्सिजन, व्हेंटीलेटर्स, बेड उपलब्ध असूनही नागरीकांपर्यंत त्याची माहिती पोहचविण्याची प्रणाली गरजेप्रमाणे निर्माण करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा तसेच त्याचे वेळोवेळी मुल्यमापन केले नाही तर लोकांमध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण होते. वैद्यकीय सुविधा व त्याची आवश्यकता यावरील किती व कशी ? यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही करण्याची गरज आहे. आॅक्सिजनच्या तुटवड्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांमधून चर्चा होत आहे परंतु जिल्'ात सध्या प्रत्येक रूग्णासाठी ७ ते ८ लिटर पर मीटर इतका आॅक्सिजन गरजेचा आहे. आज जिल्'ात जवळ जवळ एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ मे. टन आॅक्सिजन लागत असून आपल्याकडे तो ४३ मे.टन इतका उपलब्ध आहे. यातील आॅक्सिजनचा पुरवठा प्रामुख्याने वैद्यकीय प्रयोजनासाठी वापरण्यात यावा व वैद्यकीय कारणासाठी पुरेसा उपलब्ध आहे, याची खात्री झाल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाच्या व उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगासाठी त्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे. दैनंदिन आॅक्सिजन वाहतुकीसाठी टँकर्सची आवश्यकता असून त्यासाठी तात्काळ आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी दररोज आॅक्सिजनच्या वाहतुकीसाठी २ टँकर्स पुरवण्याची ग्वाही दिली आहे. कोरोना हा निरंतर चालणारा आजार असून त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर्सची निर्मिती करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी तात्काळ ई-निविदेच्या माध्यमातून तात्काळ काम सुरू करावे, कुठल्याही पेशंटला आॅक्सिजनची कमतरता सद्यस्थितीत भासणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी तसेच आॅक्सिजन बेड व व्हेंटीलेटर्सची संख्याही येणाºया काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्धता वाढविण्यासाठी नियोजन करावे. कोरोनाग्रस्तांना दुप्पट आॅक्सिजन भासेल या अंदाजाने भविष्याचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केल्या आहेत.बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्'ातील एकूण कोरोना स्थितीबाबतची माहिती विषद केली. पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कर्यक्षेत्रातील माहिती सादर केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल