शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:22 IST

Sudhakar Badgujar Nashik: नाशिकच्या राजकारणात सध्या सुधाकर बडगुजर यांचे नाव चांगलंच चर्चेत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांना पक्षात घेण्यात स्थानिक भाजपच्या नेत्यांचा कडाडून विरोध होत आहे. 

Sudhakar Badgujar BJP: सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या हकालपट्टीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले. भाजपनेच गंभीर आरोप केलेले बडगुजर आता भाजपत जाणार का? अशी चर्चा सुरू झाली. त्यांना पक्षात घेऊन नये म्हणून भाजपचे नाशिकमधील आमदार आणि माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भेट घेतली. काय घडलं या भेटीत?

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विविध घोटाळे व वेगवेगळ्या प्रकारच्या २९ गुन्ह्यांची कुंडली सादर करीत सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नये, या मागणीसाठी आमदार सीमा हिरे यांच्यासह १४ माजी नगरसेवक आणि डझनभर पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. असा प्रकार असेल तर प्रवेशासंदर्भात नक्कीच विचार करू, असे आश्वासन बावनकुळे यांनी शिष्टमंडळास दिले.

सुधाकर बडगुजर भाजपच्या वाटेवर?

ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न चालविले असून, स्थानिक नेत्यांची त्यांनी भेट घेतली होती. तत्पूर्वी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले असता बडगुजर यांनी त्यांचे स्वागत केले होते. 

बडगुजरांच्या गुन्ह्यांची कुंडली

एकीकडे बडगुजर यांचा प्रवेश घेण्यासाठी भेटीगाठी घेण्याचा सपाटा सुरू असताना त्यांच्याविरोधात भाजपमधील निष्ठावंत आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्यांसह संघानेही श्रेष्ठींना आपले मत कळवीत बडगुजर यांच्या प्रवेशास विरोध दर्शवला असताना गरम वातावरणातच आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या आजी माजी लोकप्रतिनिधींनी मुंबईत बावनकुळे यांची भेट घेत बडगुजर यांच्यावरील गुन्ह्यांची कुंडलीच बावनकुळे यांना सादर केली. 

फडणवीसांसह तीन नेत्यांची घेतली भेट

बडगुजर यांनी सीमा हिरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपतील काही पदाधिकारी यांच्यावर टीकादेखील केली असल्याचे हिरे यांनी नेत्यांच्या कानावर घातले आहे. आमदार हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदार संघातील १४ माजी नगरसेवक, चार मंडल अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळे यांची भेट घेत बडगुजर यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. 

वाचा >>नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...

पक्षाची ताकद मतदार संघासह शहरामध्ये चांगली असून, जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे हिरे यांनी नेत्यांना सांगितले. आमदारासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची भेट घेतल्यानंतर आता बडगुजर यांना भाजपात प्रवेश दिला जाणार का, याबाबत आता उत्सुकता शिगेला लागली आहे.

या पदाधिकाऱ्यांचा विरोध

आमदार हिरे यांच्यासह माजी नगरसेवक मुकेश शहाणे, राकेश दोंदे, सतीश सोनवणे, भगवान दोंदे, श्याम बडोदे, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, अलका अहिरे, पुष्पा आव्हाड, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले, नारायण जाधव, जितेंद्र चोरडिया, राहुल गणोरे, सोनाली ठाकरे, सागर शेलार, प्रदेश पदाधिकारी प्रदीप पेशकर व रामहरी संभेराव यांनी विरोध केला.

सुधाकर बडगुजर काय बोलले?

उद्धव ठाकरे गटातून माझी हकालपट्टी झाली, इतपत जगजाहीर आहे. मात्र, त्यानंतर प्रवेश घेण्यासाठी मी भाजपकडे अथवा भाजपच्या नेत्यांकडे कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलेला नाही, असे असताना माझ्या न होणाऱ्या प्रवेशाला होणारा विरोध हास्यास्पद आहे, असे सुधाकर बडगुजर या सगळ्या घटनाक्रमावर म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिकBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारण