चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ७० वर्षीय वृद्धाचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांची ओळख उशिरा पटली. बाबूराव सावळीराम राऊत (७०) रा. पाबळवाडी, विष्णूनगर, ता. निफाड असे मृताचे नाव असून, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर बाबूराव राऊत यांनी ओळख पटवून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात घेतला. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
चांदवडला वृद्धाचा अकस्मात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:24 IST