पालिकेची अशीही अर्धवट दुभाजक रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:05+5:302021-02-05T05:41:05+5:30
रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने परिसरातील सर्वच मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकले खरे मात्र सध्या दुभाजक वाहनांच्या धुराने, ...

पालिकेची अशीही अर्धवट दुभाजक रंगरंगोटी
रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने परिसरातील सर्वच मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकले खरे मात्र सध्या दुभाजक वाहनांच्या धुराने, पावसाळ्यात माती चिखल उडून खराब झाल्याने चालकांना वळण रस्ता दिसत नाही. सदर वळण रस्ता दिसावा यासाठी प्रशासनाने अनोखी शक्कल लढविल्याचे चित्र पंचवटीतील हिरावाडीत बघायला मिळते आहे. केवळ २०० मीटर अंतर असलेले दुभाजक पूर्ण रंगरंगोटी न करता वळण रस्त्यावर अर्धवट दुभाजक रंगरंगोटी काम करून प्रशासनाने परिसर सुंदर आकर्षित करण्याऐवजी अधिक बकाल करून ठेवला आहे. शहरात एकीकडे विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रशासन लाखो रुपये खर्च करते. नागरिकांकडून कराच्या माध्यमातून महसूल जमा करते. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यात उभारलेल्या दुभाजक रंगकाम खर्चाला प्रशासन एकप्रकारे कात्री लावत असल्याचे यावरून दिसून आले आहे. वळणदार रस्त्यावर वळण लक्षात यावे यासाठी दुभाजक रंगवून वळण लक्षात आणून देण्याचे काम केले तरी प्रत्यक्षात सदर रंगकाम करताना दुभाजक स्वच्छ करणे गरजेचे होते, मात्र मळखाऊ दुभाजकांवर तसाच काळा पिवळा अर्धवट रंग देत प्रशासनाने एकप्रकारे दुभाजकांना बकाल करण्याचे काम केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (फोटो २७ डिव्हायडर)