सीएट कंपनीचे कामबंद आंदोलन मागे कामगार उपआयुक्तांची यशस्वी मध्यस्थी

By Admin | Updated: June 29, 2014 00:32 IST2014-06-28T01:34:02+5:302014-06-29T00:32:52+5:30

सातपूर : येथील सीएट कंपनीतील कामगारांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन शुक्रवारी कामगार उपआयुक्तांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले़

Successful intervention of Labor Deputy Commissioner after the Ceat Company's labor movement | सीएट कंपनीचे कामबंद आंदोलन मागे कामगार उपआयुक्तांची यशस्वी मध्यस्थी

सीएट कंपनीचे कामबंद आंदोलन मागे कामगार उपआयुक्तांची यशस्वी मध्यस्थी

  सातपूर : येथील सीएट कंपनीतील कामगारांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन शुक्रवारी कामगार उपआयुक्तांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले़ शुक्रवारी दुसऱ्या पाळीपासून पूर्ववत उत्पादन प्रक्रिया सुरू झाली़ वेतनवाढीच्या कराराबाबत कंपनी व्यवस्थापन हेतूपुरस्सर विलंब करीत आहे़ करारात नवनवीन मुद्दे मांडले जात आहेत़ व्यवस्थापनाचे अधिकारी मशीनवर काम करून उत्पादन काढत आहेत़ कामगारांच्या सवलतींना कात्री लावली जात आहे. यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरल्याने कामगारांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून कामबंद आंदोलन पुकारून व्यवस्थापनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता़ याबाबत शुक्रवारी कामगार उपआयुक्त आऱ एम़ जाधव यांच्या दालनात बैठक घेण्यात आली़ या बैठकीस व्यवस्थापनाचे राधेश्याम केडिया, अभय पंचाक्षरी आणि त्यांचे सहकारी यांच्यात बैठक झाली़ कामगार उपआयुक्तांना विचारल्याशिवाय व्यवस्थापनाने एकतफर् ी निर्णय घेऊ नये व कामगारांनीही कोणतेही आंदोलन करू नये, अशी समज कामगार आयुक्तांनी दिली़ १० जुलैपर्यंत वेतनवाढीच्या करारावर स्वाक्षरी झाली पाहिजे़ दरम्यान, २ जुलैला पुन्हा बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती कामगार उपआयुक्त आऱ एस़ जाधव यांनी दिली़ या बैठकीनंतर दुसऱ्या पाळीपासून कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे़(वार्ताहर)

Web Title: Successful intervention of Labor Deputy Commissioner after the Ceat Company's labor movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.