शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विहिरीत पडलेल्या बिबट्याची स्वत:हून यशस्वी चढाई, बाहेर येताच बघ्यांची पळता भुई थोडी, दोन तास रंगला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:25 IST

Leopard In Nashik: सुमारे ६० फूट खोल पडक्या  विहिरीत पडलेल्या बिबट्याने दोन तासांच्या खडतर परिश्रमानंतर स्वत:हून विहिरीतून चढाई करीत धूम ठोकली. विहिरीतून स्वत:हून वर आलेल्या बिबट्या पाहताच  बघ्यांची पळता भुई थोडी झाल्याचे चित्र सिन्नर तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) परिसरात दिसून आले.

- शैलेश कर्पे नाशिक - सुमारे ६० फूट खोल पडक्या  विहिरीत पडलेल्या बिबट्याने दोन तासांच्या खडतर परिश्रमानंतर स्वत:हून विहिरीतून चढाई करीत धूम ठोकली. विहिरीतून स्वत:हून वर आलेल्या बिबट्या पाहताच  बघ्यांची पळता भुई थोडी झाल्याचे चित्र सिन्नर तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) परिसरात दिसून आले.

त्याचे झाले असे..सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर(माळवाडी) शिवारात खंडेराव पठाडे यांच्या शेतातील ऊसाची तोडणीचे काम सुरु होते. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊसाची तोडणी शेवटच्या टप्प्यात असतांना ऊसात दबा धरुन बसलेला बिबट्या मजूरांना दिसला. मजूरांनी आरडाओरडा केल्यानंतर आणि राहिलेला शिल्लक ऊस पेटवून दिल्यानंतर बिबट्याने ऊसातून धूम ठोकली.

 फुलेनगर-घोटेवाडी रस्त्याला माजी उपसरपंच दत्तात्रय आनप आणि सुरेश आनप यांच्या सामाईक विहिरीत सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या पडला. कुंत्रे भुंकण्याचा आवाज येत असल्याने आनप आणि माळी कुटुंबियांनी सदर बिबट्या विहिरीत पडतांना पाहिला.  सदर विहिर सुमारे ६० ते ६५ फूट खोल आहे. तथापि, सदर विहिरीत उन्हाळ्यामुळे एका कोपºयात केवळ तळाला गुडघाभर पाणी होते. जोराने पळत आलेला बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्यानंतर त्याला दम लागलेला असल्याने त्याला विहिरीतून पायºयासारख्या परंतू उंचभागातून वर येता येत नव्हते.

विहिरीतून चढण्यासाठी असलेल्या चुकीच्या दिशेने बिबट्या चढू पाहता होता. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरल्याने विहिरीभोवती परिसरातील शेतकरी व बघ्यांची गर्दी झाली. सिन्नरच्या वनविभागाला विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती देण्यात आली. सुमारे दोन तास बिबट्याचे विहिरीतून बाहेर येण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर बिबट्याने विहिरीतून पुन्हा चढाई सुरु केली आणि क्षणार्धात बिबट्या सरसर वर आला. आणि विहिरीच्या कथड्याभोवती असलेल्या बघ्यांची पळताभुई थोडी झाली. मात्र बिबट्याने कोणालाही कोणताही त्रास न देता बिबट्या शेजारील भाऊसाहेब पठाडे यांच्या ऊसाकडे पळून गेला.

ऊस पेटवताच बिबट्याची धूमखंडेराव पठाडे यांचा सुमारे पाच एकर ऊसाची तोड सुरु होती. शेवटी पाच गुंठे थोडा ऊस शिल्लक राहिला असतांना ऊसतोड कामगारांना ऊसात बिबट्या दिसला. बिबट्याला पळविण्यासाठी शिल्लक राहिलेला थोडा ऊस पेटवून देण्यात आला. त्यामुळे बिबट्याने ऊसातून पळ काढला. त्यानंतर बिबट्या फुलेनगर-घोटेवाडी रस्त्याला असलेल्या दत्तात्रय आनप व सुरेश आनप यांच्या पडक्या विहिरीत पडला.

वनविभागाने लावला पिंजरावनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊ पर्यंत बिबट्याने विहिरीतून चढाई करुन जवळच्या ऊसात आपला मुक्काम ठोकला. विहिरीत पडलेला बिबट्या जवळच असलेल्या ऊसात लपल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी फुलेनगर येथे पोहचले. सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी ए. बी. साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, महेंद्र पटेकर, नारायण वैद्य यांनी घटनास्थळी पिंजरा लावला. 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक