शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे यश...

By किरण अग्रवाल | Updated: August 23, 2020 01:11 IST

नाशिक शहराला स्वच्छतेबाबत लाभलेले मानांकन अन्य अनेक बाबींवर परिणाम करणारेच ठरणार आहे. येथील हवामान व अन्य विकासविषयक बाबींमुळे मागे ‘लिव्हेबल सिटी’च्या यादीतही नाशिकचे नाव अग्रक्रमाने झळकले होते. या साऱ्यांचा परिणाम येथील पर्यटनवाढीसाठी व त्यातून अर्थकारणावर होणे अपेक्षित आहे. नाशिकच्या विकासाचा मार्ग यातून प्रशस्त होऊ शकेल, तेव्हा आगामी काळात शहरातील स्वच्छता कायम राखण्याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्याने स्वच्छतेत मारली मजलकोणत्याही शहराचे स्मार्टपण हे तेथील मोठे प्रकल्प किंवा केवळ चकाचक इमारतींवर ठरत नसतेबांधकामांच्या निरूपयोगी साहित्याची, डेब्रिजची विल्हेवाट योग्यरीत्या होत नाही म्हणून या निकषात नाशिकला शून्य मार्क मिळाले आहेत

सारांशस्वच्छतेबाबत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिकचा नंबर देशात अकरावा तर राज्यात दुसरा आला ही बाब समस्त नाशिककरांसाठी आनंदाची व अभिमानाचीच आहे, कारण शहराच्या विकासाला गतिमान करण्यासाठी ती साहाय्यभूत ठरणार आहे; त्यामुळे या यशावर समाधानाची ढेकर न देता ते अबाधित राखतानाच त्यापुढील टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न केले जाणे अपेक्षित आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यातर्फे केल्या गेलेल्या देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा नंबर राज्यात नवी मुंबईनंतर दुसरा येणे, हे तसे साधे यश नाही. कशातच उणे नसणारे पुणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रातील मातब्बर मंत्री नितीन गडकरी यांचे नेतृत्व लाभलेले नागपूर या शहरांपेक्षा नाशिक पुढे राहिले ही यातील लक्षणीय बाब ठरावी. स्थानिक प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न असले आणि त्याला नागरिकांची साथ लाभली, तर खमके नेतृत्व असो अगर नसो; यशाला गवसणी घालता येते हेच यातून लक्षात यावे. राज्यातील इतरही शहरांनी गेल्या वर्षापेक्षा यंदा चांगली प्रगती केली आहे; पण आपण म्हणजे नाशिकने ६७व्या नंबरवरून थेट ११ वर हनुमानउडी घेतली, हे नजरेत भरणारेच म्हणायला हवे.

कोणत्याही शहराचे स्मार्टपण हे तेथील मोठे प्रकल्प किंवा केवळ चकाचक इमारतींवर ठरत नसते, त्यासाठी तेथील स्वच्छतेचा घटक अधिक महत्त्वाचा ठरत असतो. स्वच्छतेतूनच सुंदरतेकडचा प्रवास घडून येतो, शिवाय त्यातूनच आरोग्यही राखले जाते. पायाभूत सोयीसुविधा, हवामान, स्वच्छता, दळणवळणाची व्यवस्था आदीतून शहरांचा स्मार्टपणा प्रत्ययास येतो. तेव्हा अन्य बाबतीत अलीकडच्या काळात घडून आलेला विकास किंवा निसर्गदत्त लाभलेली पर्यावरणीय आल्हादकतेची देणगी आणि त्यातच स्वच्छतेच्या बाबतीतही केंद्र शासनाची लाभून गेलेली मोहर पाहता, शहराच्या विकासाची कवाडे उघडण्यास यामुळे निश्चितच मदत होण्याची अपेक्षा बळावून गेली आहे. अर्थातच शहराचा विकास म्हणजे प्रत्येक घटकाला त्यातून मिळणारी संधी, हे गणित लक्षात घेता याकडे सकारात्मकतेने पाहता यावे.चार वर्षांपूर्वी जेव्हा अशा सर्वेक्षणाला प्रारंभ झाला होता तेव्हा नाशिक १५१ क्रमांकावर होते. तेथपासून ते येथपर्यंतचा हा प्रवास महापालिका प्रशासनाच्या सातत्यपूर्वक परिश्रमाचा परिपाक आहे. ओला व सुका कचºयाचे विलगीकरण, नियमित धावणाºया घंटागाड्या, कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प, मलजलापासून वीजनिर्मिती आदी बाबी पाहण्यासाठी देशातील अन्य महापालिकांची शिष्टमंडळे आपल्याकडे येऊन जातात. तेव्हा घंटागाडीबाबत अधूनमधून कितीही तक्रारी होत असल्या तरी, या चांगल्या कामकाजालाही यानिमित्ताने दाद द्यायलाच हवी. कारण शहरातील स्वच्छता बघायला केंद्रीय पथक आले त्याच दिवशी रांगोळी वगैरे घालून स्वच्छतेचा देखावा केल्याने हे यश लाभलेले नाही, तर स्वच्छतेत सातत्य ठेवले गेल्यानेच ते शक्य झाले आहे हे नाकारता येऊ नये.

महत्त्वाचे म्हणजे शहर स्वच्छतेच्या या मोहिमेत प्रशासनाला नाशिककरांचाही मोठा सहभाग लाभला. शेजारच्या रिकाम्या प्लॉटमध्ये कचºयाच्या पिशव्या फेकून देणारे महाभागही अजून आहेत हे खरे; परंतु सुमारे पंधरा हजारांहून अधिक नागरिकांनी घरच्या घरीच कचºयाची विल्हेवाट लावली त्यामुळेही शहर स्वच्छ राहण्यात मदत घडून आली हेदेखील तितकेच खरे. तेव्हा यापुढे यातील सातत्य राखले जाणे गरजेचे आहे तसेच काही बाबतीत ज्या उणिवा राहून गेल्याचे निदर्शनास आले आहे त्याकडे लक्ष पुरवून आता आणखी पुढे कसे जाता येईल, याचा विचार केला गेल्यास देशात टॉप फाईव्हमध्ये जाणे अवघड नाही.

‘हा’ भोपळा फोडला जाणे गरजेचे...

शहरात ठिकठिकाणी होणाºया बांधकामांच्या निरूपयोगी साहित्याची, डेब्रिजची विल्हेवाटयोग्यरीत्या होत नाही म्हणून या निकषात नाशिकला शून्य मार्क मिळाले आहेत. तेव्हा आगामीकाळात या साहित्यापासून पेव्हर ब्लॉक बनवण्यासारखे पुनर्प्रक्रिया उद्योग उभारून किंवा अशाडेब्रिजचा लॅण्ड फिलिंगसाठी वापर करून हा मुद्दा निकाली काढता येणारा आहे. अर्थात त्यासाठी महापालिकेने निविदाही मागविलेल्या असल्याने आगामी काळात या बाबतीत प्रगती दिसून येणे अपेक्षित आहे.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य