Success Story : लॉकडाऊनमध्ये सुरू केलं देशी शुद्ध तुपाचं स्टार्टअप, महिन्याला 20 लाखांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:35 PM2022-01-15T20:35:37+5:302022-01-15T20:38:12+5:30

कमलजीत यांना दरमहिन्याला 2 हजार पेक्षा अधिक ऑर्डर मिळतात. त्यातून, जवळपास 20 लाख रुपये महिन्याची आर्थिक उलाढाल होत आहे. तर, यातून जवळपास 30 पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे.

Success Story : Started in lockdown, native pure ghee startup, turnover of 20 lakhs per month | Success Story : लॉकडाऊनमध्ये सुरू केलं देशी शुद्ध तुपाचं स्टार्टअप, महिन्याला 20 लाखांची उलाढाल

Success Story : लॉकडाऊनमध्ये सुरू केलं देशी शुद्ध तुपाचं स्टार्टअप, महिन्याला 20 लाखांची उलाढाल

googlenewsNext

हरयाणा - कोरोना महामारीच्या संकटात अनेकांचा जीव गेला, कित्येकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावलं. तर, लॉकडाऊनच्या काळात लाखो जण बेरोजगार झाले. मात्र, एका गोष्टीचा शेवट ही नव्या गोष्टीची सुरुवात असते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कित्येकांनी नवीन लहान-सहान उद्योग सुरू केले. पंजाबमधील 51 वर्षीय कमलजीत यांनीही कोरोना लॉकडाऊनला संधी म्हणून पाहिले अन् शुद्ध देशी तूप विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आता, देश-परदेशात त्यांचे हे तूप विक्रीस जात आहे. 

कमलजीत यांना दरमहिन्याला 2 हजार पेक्षा अधिक ऑर्डर मिळतात. त्यातून, जवळपास 20 लाख रुपये महिन्याची आर्थिक उलाढाल होत आहे. तर, यातून जवळपास 30 पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे. 51 वर्षीय कमलजीत या गृहिणी असून त्या सध्या मुंबईतच राहत आहेत. सन 2020 मध्ये जेव्हा देशात कोविडचा कहर सुरू झाला, तेव्हा कलमजीत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून त्यांची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे 4 ते 5 महिन्यांनी त्यांनी कोरोनावर मात करत ठणठणीत झाल्या. त्यातूनच, दररोजच्या कामातून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

मुंबईत असल्याने आम्हाला पंजाब म्हणजे आमच्या गावाकडून देशी तूप येत असतं. या काळात काही ओळखीच्या लोकांनाही आम्ही तेच तूप पुरवले. या लोकांना ते खूप आवडले, त्यामुळे त्यांनी आमच्याकडे सातत्याने हे तूप पुरविण्याची मागणी केली. तसेच, मार्केटमध्ये या गुणवत्तेचं तूप मिळत नसल्याचे सांगत, मार्केटमध्ये उतरण्याचा सल्ला दिला. मी विचार करुन मुलाशी चर्चा करुन मार्केटमध्ये उतरायचं ठरवलं. मुलगा हरप्रीतने मार्केटची जबाबदारी घेतली, आणि आम्ही Kimmu’s Kitchen नावाने स्टार्टअप सुरू केले, असे कमलजीत यांनी सांगितले. सुरुवातीला मुंबईतून तूप तयार करून, आपल्या नातेवाईक, ओळखीचे आणि मित्रमंडळींना त्यांनी ते द्यायला सुरुवात केली. 

कमलजीत यांचे मुंबईतील दुध पिशव्यांपासून बनवलेले तूप लोकांना पसंत पडले नाही. त्यामुळे, त्यांनी पंजाबमध्येच आपल्या तूप उत्पादनाचे युनिट सुरू केले. आपल्या घरी म्हशींची संख्या वाढवली, काही महिलांना कामावर ठेवून त्यांना रोजगार देण्यास सुरूवात केली. त्यासाठी, 7 ते 8 लाख रुपये खर्च झाले होते. गावाकडे बनणारे तूप मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी आणले. आता, देशभरात मार्केटींगद्वारे हे तूप विकले जात आहे. मार्केटींगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा कमलजीत यांनी वापर केला, त्यासाठी खास टीमही नेमली. त्यामुळे, अल्पावधीतच त्यांच्या ब्रँडचं नाव झाल्याचं त्या सांगतात. कमलजीत यांच्या ब्रँडच्या 1 लिटर तुपाची किंमत 1499 रुपये आहे. 
 

Web Title: Success Story : Started in lockdown, native pure ghee startup, turnover of 20 lakhs per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.