इ बॅँकिंग प्रॅक्टिस कोर्समध्ये मनमाड महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:53 IST2020-01-01T23:52:36+5:302020-01-01T23:53:08+5:30
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जनाबाजी सुमन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या ई-बँकिंग प्रॅक्टिसेस कोर्समध्ये मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

मनमाड महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, डॉ. प्रमोद आंबेकर, देवीदास गोरे, त्रिवेणी गोरे आदी.
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जनाबाजी सुमन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या ई-बँकिंग प्रॅक्टिसेस कोर्समध्ये मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या कोर्ससाठी राज्यभरातून १४२ विद्यार्थी बसले होते. या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी महाविद्यालयातील ४८ विद्यार्थी राज्यभरातून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले. या कोर्समध्ये वैभव गोसावी याने प्रथम, शीतल गोसावी हिने द्वितीय, तर विद्या शेवाळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, जनाबाजी सुमन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष देवीदास गोरे, त्रिवेणी गोरे, मनमाड केंद्राच्या प्रमुख विजया शेंडगे, डॉ. ओंकार खिस्त आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गजानन शेंडगे यांनी तर सूत्रसंचालन पूनम मार्कंड हिने केले.