शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

महाराजस्व अभियान जानोरीत यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 10:20 PM

जानोरी : महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत जानोरी गावातील बण रस्ता ते ओझर शिवार रस्ता अनेक दिवसांपासून वादात होता. परंतु तलाठी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आज सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून सर्वांच्या सहमतीने उद्घाटन करून रस्त्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देवादात असलेल्या रस्त्याचे आमदार निधीतून होणार डांबरीकरण

जानोरी : महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत जानोरी गावातील बण रस्ता ते ओझर शिवार रस्ता अनेक दिवसांपासून वादात होता. परंतु तलाठी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आज सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून सर्वांच्या सहमतीने उद्घाटन करून रस्त्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.महाराजस्व अभियान शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यस्व अभियान २०२० शासन परिपत्रकानुसार गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पानंद, पांधन, शेतरस्ते, शिवार, शिवरस्ते मोकळे करण्याबाबत उपविभागीय अधिकारी दिंडोरी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी तालुक्यातील तलाठी यांची सभा घेऊन तालुक्यातील बंद पडलेले रस्ते तसेच अडचणीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा करणेबाबत सूचना दिल्या होत्या.त्यानुसार जानोरी येथील तलाठी भोये, पोलीसपाटील सुरेश घुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर काठे, उपसरपंच गणेश तिडके. ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, अशोक केंग तसेच शेतकरीवर्ग यांच्या उपस्थितीत जानोरी येथील बण रस्ता ते ओझर शिवार रस्त्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केले आहे.हा रस्ता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या निधीतून डांबरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी गोरख घुमरे, सतीश घुमरे, निवृत्ती घुमरे, विनोद काठे, विलास काठे, बाळू घुमरे, विष्णू शेटे, शिवाजी घुमरे, शरद घुमरे, उत्तम घुमरे, यादव विधाते आदी शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMLAआमदार