पिंपळगाव बसवंत : येथील एका २६ वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून टोल नाका परिसरात असलेल्या कादवा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरातून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी वेळेत त्याला पकडून त्यास घरी सुरक्षित पोहोचविले असल्याची घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार परिसरात राहणाऱ्या राकेश आहेर हा युवक कौटुंबिक निराशेतून कादवा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकाने त्याला नदीवरील पुलाच्या कठड्यावरच पकडले, व इतरांना मदतीला बोलवित उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या या तरुणाला रोखले.आत्महत्या करणाऱ्या तरुणाची विचारपूस केली तर कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस तपास करत आहेत.
आत्महत्या करणाऱ्या युवकाला वाचवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 22:55 IST
पिंपळगाव बसवंत : येथील एका २६ वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून टोल नाका परिसरात असलेल्या कादवा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरातून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी वेळेत त्याला पकडून त्यास घरी सुरक्षित पोहोचविले असल्याची घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आत्महत्या करणाऱ्या युवकाला वाचवण्यात यश
ठळक मुद्देया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.