आदर्श माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांचे यश
By Admin | Updated: December 2, 2014 00:45 IST2014-12-02T00:42:52+5:302014-12-02T00:45:29+5:30
आदर्श माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांचे यश

आदर्श माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांचे यश
नाशिक : बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश मिळविले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेअंर्तगत घेण्यात आलेल्या संस्कृत परीक्षेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी गौरी पिटके ९५ गुण, इ. ८ वी चिन्मयी फलक ९८ गुण मिळवून विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांना सौ. भालेराव यांनी मार्गदर्शन केले. क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर आदित्य गोरे, रितेश देशमुख (तलवारबाजी), राज्यस्तरावर विराज खोडके (जलतरण), नचिकेत निकम (तायक्वांदो), श्वेता शिंदे (ज्युदो), हर्षाली वेरूळकर (योगा), विभागीय स्तर-श्रेयस चव्हाण (मल्लखांब), कस्तुरी कासार (तायक्वांदो) निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना जाधव यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित राज्यस्तरीय परिषदेत सन्मिल लगड, कौशल वडनेरे यांच्या माझ्या शाळेजवळील परिसरातील वायुप्रदूषणाचा अंदाज व पडताळणी या विषयाची सादरीकरणासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना ठोके यांनी मार्गदर्शन कले