सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश

By Admin | Updated: August 7, 2014 01:57 IST2014-08-07T01:57:32+5:302014-08-07T01:57:32+5:30

सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश

Success of cement purchase movement | सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश

सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश

नाशिक : सीमेंट कंपन्यांनी कुठलेही कारण नसताना प्रतिगोणी तब्बल शंभर रुपयांच्या आसपास केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशनने पुकारलेल्या सीमेंट खरेदी बंद आंदोलनाला यश आले आहे. सीमेंट कंपन्यांनी दरवाढ मागे घेत, आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.
महिनाभरापूर्वी सीमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी ३० ते ३५ टक्के दरवाढ केल्याने २५० रुपयाला मिळणाऱ्या गोणीची किंमत ३६० रुपयांवर पोहचली होती. कंपन्यांनी अचानक केलेल्या या दरवाढीमुळे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांवर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यान, सीमेंट कंपन्यांनी केलेली ही दरवाढ कृत्रिम असून, त्यामुळे विकासकांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असल्याचा सूर व्यक्त करीत क्रेडाईने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पुढे बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाला सोबत घेऊन राज्यभर आंदोलन छेडले.
पहिल्या टप्प्यात सीमेंट खरेदी बंद आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात थेट काम बंद आंदोलन छेडत सरकारने या प्रकरणी लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न केले गेले. तसेच केंद्र व राज्यमंत्र्यांना भेटून कंपन्यांबाबत निश्चित धोरण जाहीर करण्याची मागणीही केली. अखेर क्रेडाई व बीआयएच्या आंदोलनाची दखल घेत सीमेंट कंपन्यांना दरवाढ मागे घ्यावी लागल्याची माहिती क्रेडाईचे नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया नाशिकचे अध्यक्ष विलास बिरारी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Success of cement purchase movement