जीवनात संघर्ष केल्याने यश प्राप्ती : नेहा जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:16 IST2018-01-29T00:16:32+5:302018-01-29T00:16:47+5:30

 Success achieved by struggling in life: Neha Joshi | जीवनात संघर्ष केल्याने यश प्राप्ती : नेहा जोशी

जीवनात संघर्ष केल्याने यश प्राप्ती : नेहा जोशी

नाशिकरोड : जीवनात कोणत्याही क्षेत्रात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. नाटक, चित्रपट किंवा मालिका यातून आपल्याला वाटचाल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु यातून मार्ग काढीत प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले.
नाशिकरोड येथील ऋतुरंग भवनात आयोजित ऋतुरंग कला महोत्सवात जोशी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी कलाजीवनातील यशस्वी वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी नेहा म्हणाली की, नाशिकला लहानपणी आई-वडिलांकडून कलेचे बाळकडू मिळाले. त्यानंतर कथ्थक, शास्त्रीय संगीत शिकले, त्यानंतर मुंबईला अनेक अडचणींना तोंड देत चित्रपट, मालिकांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. सहकारी तसेच ज्येष्ठ कलावंतांकडून खूप काही शिकायला मिळाले, असेही नेहा जोशी यांनी सांगितले. नेहाचे वडील व ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी नेहाच्या नाट्य, मालिकेतील प्रवासाविषयी विविध पैलूंना उजाळा दिला.

Web Title:  Success achieved by struggling in life: Neha Joshi

टॅग्स :Nashikनाशिक