शहरात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:45 AM2020-08-19T01:45:49+5:302020-08-19T01:46:40+5:30

शहरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ रुग्ण आढळून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याने संसर्ग रोखण्यात यश येत आहे.

Succeeding in breaking the chain of corona victims in the city | शहरात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यात यश

शहरात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यात यश

Next
ठळक मुद्देमिशन झिरो नाशिक : दिवसभरात साडेचारशे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ रुग्ण आढळून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याने
संसर्ग रोखण्यात यश येत आहे.
एकूण चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १२.४३ टक्के आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. १८) ४५२ रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, ठाण्यापाठोपाठ अ‍ॅँटिजेन चाचण्यांमध्ये नाशिकचा चौथ्या क्रमांक आहे. चाचण्यांमधून तब्बल ४ हजार ३३४ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. १८) दिवसभरात एक हजार १५१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात १८८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व शासकीय रुग्णालये व खासगी लॅब मिळून ४५२ रुग्ण आढळले आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात सीआयसीएस कॉलनी, नेहरूनगर येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्ण, स्रेहनगर येथील ७२ वर्षीय वृद्ध, सिडकोतील पवननगर येथील ४७ वर्षीय पुरुष, नाशिकरोड येथील जेलरोड भागातील ५१ वर्षीय महिला तसेच नाशिक शहरातील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. शहरात कोरोना-बाधितांची संख्या वाढत असल्याने नाशिक महापालिका आणि भारतीय जैन संघटनेने मिशन झिरो सुरू केले आहे.
त्याअंतर्गत मिशन झिरो नाशिककरिता २२५च्यावर कर्मचारी व कार्यकर्त्यांचे पथक असून, मोहिमेच्या २५व्या दिवशी एक हजार १५१ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्या व त्यापैकी १८८ रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत २५ दिवसात ३४,८६१ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, ४३३४ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. त्याचप्रमाण एकूण झालेल्या चाचण्यांपैकी १२.४३ टक्के असल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख नंदकिशोर साखला यांनी दिली.
चाचणीबरोबरच प्रबोधनही सुरू
या मोहिमेअंतर्गत केवळ रुग्णांचा शोधच घेतला जात नसून त्यांच्यावर उपचार व प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांना औषधोपचार देतानाच आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यक्तींची तपासणी करणे अशा प्रकारची कामे केली जात आहेत.
साडेचौदा हजार
रुग्ण कोरोनामुक्त
४नाशिक शहरात एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत १७ हजार ४२० रुग्ण आढळले आहेत. त्यातील १४ हजार ६६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत २ हजार ३४९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
४मोबाइल व्हॅनद्वारे लोकवस्तीच्या भागात नागरिकांची आरोग्य तपासणी करून चाचण्या करण्यात येत आहेत.

Web Title: Succeeding in breaking the chain of corona victims in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.