जिल्हा बॅकेची धडक वसूली मोहीम थांबवण्यासाठी निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:50 IST2019-03-30T18:49:23+5:302019-03-30T18:50:40+5:30
लासलगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या करत असलेली धडक वसूली मोहीम त्वरित थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हा बॅकेची धडक वसूली मोहीम थांबवण्यासाठी निवेदन सादर
लासलगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या करत असलेली धडक वसूली मोहीम त्वरित थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले.
सध्या जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या जमिनीवर नाव लावण,े जप्ती करणे, तसेच शेतजमिनीचा लिलाव करणे, अशा स्वरुपाची कारवाई करत आहे.
गेल्या काही वर्षापासून शेतमालाचे पडलेले दर अवकाळी पाऊस गारपिट आणि भीषण पाणी टंचाईच्या समस्येतून नाशिक जिल्ह्याचा शेतकरी जात आहे. अश्यातच जिल्हा बँकेच्या नोटिसा त्यांच्या पथकांची शेतकऱ्यांना होणारी दमदाटी, यामुळे शेतकरी पुरता घाबरून गेला आहे. अशा परिस्थितीत बँकेची ही वसूली निश्चितच शेतकरी आत्महत्या वाढवतील, असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन देतांना डॉ. तुषार शेवाळे, सचिन होळकर, निर्मला खर्डे, सुरेश कुमावत जयश्री नगरे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी जिल्हाधिकारी खेडकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच सहकार आयुक्त यांना देखील दिले आहे.
(फोटो ३० लासलगाव)