दिव्यांग अधिकार कायद्याच्या संदर्भात घोटी पोलिस ठाण्यात निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 16:40 IST2020-07-29T16:37:36+5:302020-07-29T16:40:17+5:30
नांदूरवैद्य : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग अधिकार २०१६ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना पोलीस ठाण्यात दिव्यांग सुरक्षेबाबत प्रथम प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना बुधवारी (दि.२९) निवेदन देण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक मोहित मोरे यांना बुधवारी निवेदन देतांना प्रहार अपंग संघटनेचे पदाधिकारी.
नांदूरवैद्य : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग अधिकार २०१६ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना पोलीस ठाण्यात दिव्यांग सुरक्षेबाबत प्रथम प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना बुधवारी (दि.२९) निवेदन देण्यात आले.
दिव्यांग हक्काचे प्रभावी संरक्षण करण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रहार अपंग संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे. दिव्यांग अधिकार कायद्याच्या कक्षेत दिव्यांगांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दिव्यांग बांधवांना समाजात आपमानस्पद वागणूक देणे, शिवीगाळ, मारहाण, दमदाटी, फसवणूक व शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या वाढत्या तक्र ारीनुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आमदार बच्चू कडू यांना कळविले होते. यावेळी जिल्हा समन्वयक गोपाळ शिंदे, तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपतालुकाप्रमुख सोपान परदेशी, सरचिटणीस तन्वीर खान हे उपस्थित होते.