पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 17:23 IST2018-02-07T17:23:12+5:302018-02-07T17:23:27+5:30

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर
नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील प्र्त्यक मूल प्रगत होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन निश्चित करण्यात येणार असून, या प्रक्रियेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये सुरुवात झाली आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा इयत्तानिहाय अध्ययन स्तर निश्चित करण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला असून, हा अध्ययन दर निश्चित झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी प्रगत करण्याच्या दृष्टीने ठोस कृतिकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिकचे प्राचार्य तथा उपसंचालक व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकाºयांना पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. अध्ययन स्तर निश्चिती कार्यक्रम सर्व क्षेत्रीय परीवेक्षीय यंत्रणेमार्फत १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष असून, अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर १० फेब्रुवारीलाच सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर माहिती संकेतस्थळावर सादर करण्याच्या सूचनाही सर्व गटशिक्षण अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.